शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

81 लाख आधारकार्ड रद्द; तुमचं नाव यात नाही ना? तपासून पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:33 IST

महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती.  पॅननंतर आता सरकारनं आधार कार्डवर कात्री लावली आहे.

नवी दिल्ली, दि. 16 - महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती.  पॅननंतर आता सरकारनं आधार कार्डवर कात्री लावली आहे. नियमानुसार देशातील नागरिक एकच आधार कार्ड वापरू बनवू शकतो.  आतापर्यंत 111 कोटी भारतीयांनी आधार कार्ड काढले आहे. सरकारी योजनांसाठी आजघडीला आधारचा दहा आकडी यूनिक आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.  मात्र, तुम्हाला माहित आहे का? सरकारनं 81 लाख आधार कार्ड रद्द केली आहे. 

गेल्या काही दिवसांत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणे बंधनकारक करण्यात आलेय. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे की, आपले आधार कार्ड रद्द झाले नाही ना. 

कशी तपासणार आधार कार्डची वैधता ? आधार रद्द केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना चुकून स्वतःचे आधारकार्ड रद्द झालेले नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. आधार कार्ड रद्द झाले आहे की नाही? हे अगदी काही वेळेतच तुम्ही ऑनलाइन तपासून पाहू शकता. \

- आधार नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही स्टेप्स. सर्वप्रथम UIDAIच्या संकेतस्थळावर जा. https://uidai.gov.in/ ही आहे लिंक.

- ही लिंक तुम्हाला नव्या पेजवर घेऊन जाईल. ओपन झालेल्या पेजवर आधार कार्ड नंबरची माहिती मागितली जाईल. आधार कार्डनंबर टाका. तुम्ही एक सुरक्षित कोड टाका आणि व्हेरीफायवर क्लिक करा.

- Verify वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. येथे लिहीलेला आधार नंबर ****** Exists. त्यानंतर त्याच्या खाली तुमचे वय आणि तुमचा मोबाईल नंबरची माहिती असेल. हे सर्व तुम्ही लिहिले असेल तर तुमचे आधार कार्ड अधिकृत असेल आणि ते रद्द झालेले नसेल.

- यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.  

31 ऑगस्टपर्यंत आधार कार्डसोबत जोडा पॅन कार्ड सरकारनं करदात्यांना आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.  31 ऑगस्टपर्यंत पॅन कार्ड जोडले नाही तर ते रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

करदात्यांचा वाढता ओघ पाहता प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.

आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे एका अधिकाºयाने रविवारी सांगितले होते.  आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाइल झालेले सध्याच दोन कोटी रिटर्न आले आहेत. करदात्याने रिटर्न वेळेतच दाखल करावे, असेही अधिका-याने सांगितलं होते.